प्रतिनिधी, नाशिक : शरद संवाद यात्रा निमित्त आज चांदवड नगरीत महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महबूब शेख यांचे चांदवड तालुका युवक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे शाल फुल गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी चांदवड येथील युवकांनी आपल्या सोबत काही नवीन युवकांनी पक्षात आले असून तर त्यांना येणारा जिल्हा परिषद पंचायत समिती नगर परिषद ग्रामपंचायत यामध्ये आपल्या पक्षाकडून निवडणुकीसाठी अधिकृत करावे अशी काही युवकानी मागणी केली.
तसेच या बैठकीचे प्रास्ताविक दत्तात्रय वाकचौरे युवक राष्ट्रवादी काँग्रेस चांदवड तालुका अध्यक्ष यांनी केले. तर या प्रसंगी विजय गांगुर्डे. सयाजीराव गायकवाड. शिवाजी सोनवणे. पुरुषोत्तम कडलक. यांनी आपले याप्रसंगी मनोगत व्यक्त केले. तसेच चांदवड शहरात राष्ट्रवादी युवक पक्षाचे कार्यकर्ते जास्त संघटित करावे व पक्षाचे जुने कार्यकर्ते आपले मरगळ झटकून टाकावी असे पुरुषोत्तम कडलक यांनी सांगितले.तसेच यावेळी शरद पवारांचे विचार युवकांपर्यंत पोचवावे व जास्तीत जास्त युवक संघटित करावे असे यावेळी या शरद संवाद यात्रा निमित्त महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहेबुब भाई शेख यांनी याप्रसंगी बोलले.
