जनतेज न्युज

चारीत्र्याच्या संशया वरून तलाठी पत्नीचा पतीने खुन

प्रतिनिधी , जळगाव : जळगाव जिल्हा तील माहिजी येथे तलाठी पदावर असलल्या अरुणा नितीन पवार (42) यांचा चारीत्र्याच्या संशयातून पोलिस दलात सेवेत असलेल्या मात्र हल्ली निलंबीत असलेल्या पतीनेच डोक्यात अवजड वस्तू मारून खून केल्याची घटना घडली
पत्नी जीन्यावरून पडल्याचा केला होता बनाव
पाचोरा शहरातील पुनगाव रोडवरील मौर्या कन्ट्रक्शनमधील रहिवासी तथा
माहेजी येथे तलाठी पदावर कार्यरत असलेल्या अरुणा नितीन पवार (42) यांच्या चारीत्र्यावर आरोपी पती नेहमीच संशय घेत असल्याने दोघांमध्ये नेहमीच खटके उडत होते. या विषयावर नितीन व अरुणामध्ये रविवार, 29 रोजी दुपारी दोनच्या सुमारास भांडण झाले. त्यात नितीन मोतीलाल पवार याने अवजड वस्तू डोक्यात मारल्यानंतर अत्यवस्थ अवस्थेत अरुणा हिला खाजगी रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले तर आरोपीने पत्नी जीन्यावरून पडल्याने जखमी झाल्याची बतावणी केली मात्र पोलिस चौकशीत आरोपीचा बनाव उघड झाला व त्याने खुनाची कबुली दिली. या प्रकरणी मयताची आई मीराबाई परशुराम ठाकरे (60, अष्टविनायक कॉलनी, भुसावळ) यांनी फिर्याद दिल्यावरून आरोपी नितीन पवारविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तपास पोलिस निरीक्षक नजन पाटील करीत आहेत