जनतेज न्युज

चाळीसगाव शहर पोलिसांची कामगिरी… पुन्हा एक गुटखा विकणाऱ्याला अटक…

प्रतिनिधी , चाळीसगांव : चाळीसगांव शहर पोलिसांनी हिरापूर रोड येथून एका गुटखा विणाऱ्याला ताब्यात घेत एकूण 33305 रुपये किंमतीचा गुटखा जप्त केला
दिनांक 18 रोजी सायंकाळच्या सुमारास चाळीसगांव शहर पोलिसांनी, जुना नाक्याच्या पुढे, हिरापूर रोड ठाकूरवाडी,येथील विनोद किराणा प्रॉव्हिजन या दुकाणावर छापा टाकून आरोपी विनोद सुदाम येवले वय 45 याच्या ताब्यात असलेला सुमारे 33305 रुपया किंमतीचा कुटखा जप्त करत त्यावर गुन्हा दाखल केला. ही कारवाई चाळीसगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजयकुमार ठाकूरवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षण दांडगे, पोलीस उपनिरीक्षक विजय साठे, पोलीस कॉन्स्टेबल गणेश पाटील,विनोद भोई,प्रवीण सपकाळे,भूषण पाटील इत्यादींनी केली.