जनतेज न्युज

चुकीच्या कामासाठी सिडकोने कंत्राटदाराला ठोठावला १५ लाखांचा दंड

प्रतिनिधी: बेलापुर किल्ल्याच्या संवर्धनाच्या कामासाठी सिडकोकडून नेमण्यात आलेल्या कंत्राटदार व सल्लागार यांनी एकमताने किल्ल्यामध्ये केलेले काम हे चुकीच्या पद्धतीने सुरू असल्याबाबत तक्रारदार नितिन चव्हाण यांनी सिडको व पुरातत्व विभागाशी अनेकदा पत्रव्यवहार करून तसेच सिडको विरोधात आंदोलन अखेर हे चुकीच्या पद्धतीने सुरु असलेले हे काम थांबवले होते. मात्र त्यावेळी काही स्थानिक नेत्यांनी तक्रारदार जाणीवपूर्वक आरोप करत असल्याचे म्हंटले होते. मात्र आता त्याच कामाची चौकशी होऊन सिडकोने कंत्राटदाराला चुकीच्या कामासाठी 15 लखांचा दंड ठोठावला आहे.त्यामुळे स्थानिक नेत्यांच्या दाव्याची पोलखोल झाली असून,आम्हाला न्याय मिळाला असल्याचे तक्रारदार सांगत आहेत. तर पुढचे काम देताना सिडकोने योग्य ठेकेदाराला द्यावे ही अपेक्षा व्यक्त केली.