जनतेज न्युज

चोपड्यात कॉलनी परिसरात कोरोना चे रुग्ण मोठ्या संख्येने आढळल्याने प्रशासनात खळबळ.

प्रतिनिधी , चोपडा : चोपडा शहरातील यावर रस्त्यालगत असलेल्या कॉलनी परिसरात काल कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळल्याने प्रशासनासह नागरिकांमध्ये खळबळ उडाली आज या परिसरातील नागरिकांची नगरपालिका रुग्णालयाच्या माध्यमातून आशा वर्कर या परिसरात घरोघरी जाऊन सर्वे करीत आहे पंकज विद्यालयात चोपडा नगरपालिकेच्या रुग्णालया मार्फत डॉक्टर चंद्रकांत बारेला यांची टीम शिबिर घेत आहे व नागरिकांचे स्वँब घेऊन टेस्टिंग करीत आहे तसेच परिसरातील नागरिकांना रुग्ण च्या संपर्कात आलेल्या व ज्यांना काही लक्षण दिसत असेल अशा नागरिकांनी टेस्टिंग करून घ्यावे असे आव्हान नगरपालिकेच्या रुग्णालयाचे डॉक्टर चंद्रकांत बारेला यांनी केले आहे तसेच या परिसरातील प्रत्येक एरियामध्ये दहा ते बारा रूग्ण आढळले आहेत त्यामुळे हा एरिया निश्चितच कंटेनमेंट झोन जाहीर केला गेला पाहिजे लोकांमध्ये सोशल डिस्टन्स ठेवला गेला पाहिजे असे यावेळी सांगितले.

  • कॉलनी परिसरात कोरोना चे रुग्ण आढळत असल्याने पंकज विद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांचे टेस्टिंग या कॅम्प मध्ये करण्यात येत असल्याने व संस्थेचे संचालक पंकज बोरोले यांनी सुचना दिल्या असल्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक व्ही आर पाटील यांनी सांगितले.