जनतेज न्युज

चोपड्यात कोरेगाव भिमा शौर्य दिनानिमित्त अभिवादन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात विजयस्तंभाची प्रतिकृती उभारून अभिवादन

प्रतिनिधी , चोपडाः कोरेगाव भिमा शौर्य दिनानिमित्त अभिवादन,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात भिमान ग्रुप रिअल इस्टेट व डेव्हलपर्स चे संस्थापक सतिष वाडे यांचाकडुन विजयस्तंभाची प्रतिकृती उभारण्यात आली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला नगरसेवक आशोक बाविस्कर,रमेश शिंदे,माजी प .स.सभापती गोपाळराव सोनवणे,हितेश मोरे सर ,वाणेसर,भरत शिरसाठ आदींनी माल्यार्पण करून सामुहिक बुध्दवंदना म्हणण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून विजयस्तंभाला अभिवादन करण्यात आले.यावेळी समता सैनिक दलाच्यावती पथसंचालन करण्यात आले तसेच माजी सैनिक एस व्ही करंदीकर,धनराज बाविस्कर यांनी विजयस्तंभाला पुष्पचक्र वाहुन अभिवादन केले.शौर्य दिनानिमित्त विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी सेवानिवृत्त तहसीलदार मैलागिर साहेब,संजय अहिरे,संतोष अहिरे,समाधान सपकाळे,बुरसिंग बाविस्कर,भिवराज रायसिंग,रोहिदास अहिरे,दिपक वानखेडे,यांच्यासह सकाळ पासून विजयस्तंभाला अभिवादन व मानवंदना देण्यासाठी शहरासह तालुक्यातील अनुयायी येत होते.