जनतेज न्युज

चोरलेले मोबाईल,दागिने,टू व्हीलर, रिक्षा, ऑडी नौपाडा पोलिसांनी नागरिकांना केले सुपूर्द*

प्रतिनिधी, ठाणे : नौपाडा पोलिसांनी विविध गुन्ह्यातील आरोपींना पकडून त्यांच्या जवळून चोरीला गेलेला मुद्देमाल जप्त केला व आज तो सर्व मुद्देमाल फिर्यादिना परत केला, या मध्ये तक्रारदार डॉ अनुजा कुलकर्णी यांचा सॅमसंग गँलॅक्सी कंपनीचा मोबाईल त्यांच्या क्लिनिक मधुन चोरून आरोपीने तामिळनाडू येथे विकला होता. तो पोलिसांनी मोठ्या हुशारीने हस्तगत केला. चरई येथील रविंद्र कारेकर यांच्या घरातील पंधरा ग्रॅमची सोन्याची चैन, दोन फोन, दोन घड्याळ असा चोरून नेलेला माल पोलिसांनी हस्तगत केला. त्या नंतर मुंब्रा येथील आलम खान यांची ऑडी गाडी त्यांनी मोठ्या विश्वासाने ललित शर्मा या मित्राला दिली होती. त्याने ती गाडी शशी शर्मा याला बारा लाखाला परस्पर विकली, ती गाडी पोलिसांनी तांत्रिक तपास करून नागपूर येथून जप्त केली, ती फिर्यादीना परत केली. सिदद्धेश्वर तलाव येथील आरती वाळंज या कुटुंबासाह गावी गेल्या असता त्यांच्या घरातून सोने व रोख रक्कम 81 हजार रुपये चोरीला गेलेला माल पोलिसांनी दोन आरोपींना अटक करून त्यांच्या कडून हस्तगत केला. नौपाडा येथील दीपिका गंगूत्रे यांच्या गळ्यातील चैन ओढून पळून गेलेल्या आरोपींना पकडून त्यांच्या कडून 45,000/- रुपयाची चैन हस्तगत करून त्यांना आज परत देण्यात आली. रोहित कदम यांची चोरीला गेलेली ऍक्टिव्हा गाडी एका अल्पवयीन आरोपीला पकडून त्याच्या कडून ताब्यात घेण्यात आली. सुनिल नलावडे यांचा नितीन कंपनी येथून चोरून नेलेला मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आणि त्यांना परत करण्यात आला. महेश दळवी यांची चोरून नेलेली हिरो होंडा मोटारसायकल बेवारस मिळून आली ती त्यांना परत करण्यात आली. डॅनियल अल्मेडा यांची चोरून नेलेली टीव्हीएस कंपनीची मोटारसायकल रस्त्यावर बेवारस मिळून आली ती आज परत करण्यात आली. राजकुमार यादव यांची चोरून नेलेली रिक्षा बेवारस पणे रस्त्याच्या कडेला आढळून आली ती आज त्यांना परत करण्यात आली. चंद्रकांत कातकडे यांची चोरून नेलेली याम्हा कंपनीची फसीनो मोटार सायकल तलावपाळी येथे बेवारस पणे मिळून आली ती त्यांना परत करण्यात आली. नौपाडा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांनी व त्यांच्या सहकार्यांनी वरील हा सर्व 1 करोड 20 लाख रुपयाचा मुद्देमाल हस्तगत करून आरोपींना अटक केली आहे व कोर्टाचे सर्व सोपस्कार पूर्ण करून नागरिकांना परत दिला. या बद्दल सर्व नागरिकांनी पोलिसांचे विशेष आभार मानले.