जनतेज न्युज

चोरीचे मोबाईल मधील डेटा फॉरमॅट करणारे 3 आरोपीना अटक

प्रतिनिधी , मुंबई : वेगवेगळ्या राज्यांतील चोरीच्या महागड्या मोबाईल चा डेटा फॉरमॅट करुन त्याला विकणाऱ्या 3 आरोपीना मा मंबई क्राईम ब्रांच च्या युनिट 12 ने पकडले आहे. हे आरोपी सॉफ्टवेअर च्या मदतीने अतिशय चालखीने महागड्या मोबाईल मधील सर्व डेटा फॉरमॅट करत असत. नंतर त्या मोबाईल ची बॉडी बदलून पुन्हा त्याला विकत असत. क्राईम ब्रँच युनिट 12 या गुन्हेगारांकडून तब्बल 70 हून जास्त मोबाईल हस्तगत केले असून त्यांची किंमत मार्केटमध्ये आज 9 लाखाच्या घरात आहे.
दहिसर पूर्व येथे राहणाऱ्या शैलेश बीच्कर यांच्या तक्रारीनंतर क्राइम ब्रँचच्या युनिट बाराच्या अधिकाऱ्याने मोबाईल चोरीच्या टोळीचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यानंतर पोलिसांना माहिती मिळाली की अंधेरी पश्चिम येथील बोनी प्लाजा शॉपिंग सेंटरच्या शॉप नंबर 23 मध्ये चोरीचे महागडे मोबाईल घेऊन त्याचा देता फॉरमॅट केला जातो व iphone चे क्लाऊड अकाउंट डिलीट केला जातो यानंतर पोलिसांनी आपले जाळे विणून या दुकानावर सतत लक्ष भाविकांनी ठेवले त्यानंतर त्यांना मिळालेल्या माहितीनुसार दोन चोर मोबाईल घेऊन या दुकानात येणार असल्याचा संशय आल्यानंतर पोलिसांनी आपले जाळे विणून त्या पूर्ण दुकानदार सोबत या तीन व्यक्तींना आता अटक केले आहे त्यांच्याकडून आतापर्यंत 70 मोबाईल फॉरमॅट मारने वाला सॉफ्टवेअर आणि वेगळ्या कंपनीचे सिम कार्ड मिळाले आहे.