प्रतिनिधी , औरंगाबाद : महाराष्ट्रातील शेतकरी हा अनेक संकटांना सामोरे जाऊन पुन्हा एकदा खंबीरपणे उभे राहत असतो मात्र शेतकरी हा फक्त शेतीवरच अवलंबून असल्याने आज शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असून शेतीला जोडधंदा म्हणून रेशीम शेती या कडे बघितल्या जात आहे
सोयगाव तालुक्यातील शेतीबाबत प्रगतिशील गाव म्हणून जरंडी या गावची ओळख आहे या गावातील शेतकरी शेतीमध्ये विविध प्रयोग करून बघतात त्यातच आता या गावातील शेतकरी रेशीम शेतीकडे सरसावले आहेत
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत या गावातील 40 शेतकऱ्यांनी रेशीम शेतीसाठी तुती या पिकाची लागवड केली आहे
रेशीम शेती ही शेतीला जोडधंदा म्हणून पर्याय असल्याचे बोलले जात आहे
