प्रतिनिधी , जलयुक्त शिवार योजनेचे त्यावेळी उद्धव ठाकरे यांनीच कौतुक केलं होत आणि आता चौकशी लावली जातेय हे सगळं आकसापोटी आणि सूडबुद्धीने केलं जात असून चौकशीत काहीही निष्पन्न होणार नाही असा दावा माजी जलसंधारण मंत्री राम शिंदे यांनी केलाय. महिनाभरात चौकशीच्या अहवालात काय येतं ते बघू मात्र त्यावेळी शिवसेना आणि त्यांचे मंत्री या योजनेत सहभागी होती, त्यामुळे आता उपयोग नाही शिवाय कॅगने भ्रष्टाचार झाला असं म्हंटलेलं नसून सूचना केल्याचे शिंदे यांनी म्हटलंय.
