प्रतिनिधी , जालना : सध्या राज्यासह देशात शेतकरी राजा पार संकटात सापडला असुन शेतकऱ्यांवर एका पाठोपाठ एक संकटे उभी राहत आहेत. जेमतेम निसर्गाने साथ दिली आणि उत्पन्न घरात आले. तर बाजारात त्याला भाव मिळत नाही. जालना जिल्ह्यात मिरची उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात असुन राज्यात होणाऱ्या मिर्चीच्या उत्पादनातील मोठा हिस्सा या जिल्ह्याचा असतो.
पण आज रोजी जालना जिल्ह्यातील मिर्ची उत्पादक शेतकरी मिर्चीला मिळणाऱ्या कमी भावामुळे हतबल झाला आहे. हिरव्या मिर्ची ला भाव न मिळाल्याने, लाल मिर्चीला भाव मिळेल या आशेवर शेतकरी राहीला. त्यातुन लाल मिर्चीचे मोठ्या प्रमाणावर उत्पन्नही झाले. पण ही लाल मिर्ची तीन हजार रु. क्विंटलने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येत आहे. या भावातुन उत्पादन खर्चही निघणार नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे.
