प्रतिनिधी, नंदुरबार : नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्षपदाची निवडणूक येता 17 जुलैला पार पडणार आहे परंतु महाराष्ट्रातील सध्याचे राजकारण पाहता त्याचा प्रभाव नंदुरबार येथील जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पडणार नाही व महाविकास आघाडीचाच उमेदवार जिल्हा परिषद अध्यक्ष पदावर विराजमान होईल असे मत नंदुरबार जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व नवापूर मतदार संघाचे आमदार शिरीष कुमार नाईक यांनी व्यक्त केले.सध्या महाराष्ट्रातील राजकारणात मोठी उलथापालट पाहण्यास मिळत आहे शिवसेनेतून एक मोठा गट बाहेर पडल्यामुळे महा विकास आघाडी सरकार अस्थिर झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे कधीही सरकार पडू शकते अशी परिस्थिती निर्माण झाली आहे .परंतु महाराष्ट्रातील परिस्थितीचा नंदुरबार जिल्ह्यात कोणताही परिणाम होणार नसून आगामी येऊ घातलेल्या नंदुरबार जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचेच उमेदवार विजयी होतील व सत्ता अबाधित राहील .नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये आज काँग्रेसचे उमेदवार ऍड सीमा वळवी अध्यक्ष आहेत तर उपाध्यक्ष शिवसेनेचे ऍड राम भय्या रघुवंशी आहेत. महाराष्ट्रात शिवसेना ,काँग्रेस ,राष्ट्रवादी अशी महाआघाडी असताना नंदुरबार जिल्हा परिषदेमध्ये देखील परिवर्तन होईल असे वाटत आहे परंतु नंदुरबार जिल्हात महाराष्ट्रातील राजकारणाच्या 1% ही फरक पडणार नाही. जिल्हा परिषदेत महाआघाडीची सत्ता अबाधित राहील .असे मत आमदार शिरीष नाईक यांनी व्यक्त केले .महाराष्ट्रातील परिस्थिती पाहता नंदुरबार जिल्हा परिषदे मध्ये देखील काही बदलाव पाहण्यास मिळू शकतो परंतु ते येणारा काळ ठरवेल…
