जनतेज न्युज

जिल्हा परिषद च्या अर्थसंकल्पात 21 कोटींचे अंदाजपत्रक सादर… ऑनलाइन पार पडली जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक… विविध विभागासाठी भरीव तरतुदीचा सत्ताधाऱ्यांचा दावा…

प्रतिनिधी , बुलडाणा : आज जिल्हा परिषद चा सण 2021 – 22 चा अर्थ संकल्प सादर करण्यात आला यावेळी ज्यामध्ये 21 कोटी रुपयांचे अंदाजपत्रक अर्थ व बांधकाम सभापती रियाज खान पठाण यांनी सादर केले. कोरोनामुळे जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांची बैठक ही ऑनलाइन पद्धतीने पार पडली.
सादर झालेल्या या अर्थसंकल्पावर कोरोनाचा सावट पाहायला मिळाले जिल्हापरिषद चे अर्थ बांधकाम सभापती रियाझ खान पठाण यांनी सुरू झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हापरिषद चा अर्थसंकल्प सादर केला, यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, उपाध्यक्ष कमल जालिंदर बुधवत, महिला बाल कल्याण सभापती ज्योति अशोक पडघान, समाजकल्याण सभापती पूनम राठोड,कृषी सभापती राजेन्द्र पळसकर,मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री विसपुते, मुख्य वित व लेखा अधिकारी शिल्पा पवार आदी हजर होते.
यंदाच्या अर्थसंकल्पात सर्व समाज घटक व विकास कामांसाठी सर्वसमावेशक तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले,सन 2021-22 चे मूळ अंदाज पत्रक 21 कोटी 3 लाख 16 हजार 593 रुपये होते तर 2020 -21 चे सुधारित अंदाजपत्रक 30 कोटी 39 लाख, 50 हजार 798 रुपये इतके करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले,ज्यामध्ये समाजकल्याण विभागासाठी उत्पन्नाच्या 20 टक्के निधी,महिला बाल कल्याणसाठी 1 कोटी 37 लाखाची तरतूद,कृषी विभागासाठी 1 कोटी 1 लाख तर पशुसंवर्धनसाठी 1 कोटी 9 लाखाची तरतूद,स्मार्ट व्हिलेज जनसुविधासाठी 1 कोटी 15 लाखांचा निधी,आरोग्य विभागासाठी 1 कोटी 17 लाख,रस्ते, पूल, व नाले यासाठी दीड कोटी,ग्रामीण पाणी पुरवठा योजना दुरुस्ती साठी 20 टक्के निधी,दिव्यांग कल्याण साठी 5 टक्के,शिक्षण विभागासाठी 1 कोटी 19 लाखांची तरतूद या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे,यावेळी झूम ऍप द्वारे सर्व तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य व अधिकारी बैठकीत सहभागी झाले होते.