जनतेज न्युज

जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या सौ.लिनाताई शेगोकर 1700 मतांनी विजयी

प्रतिनिधी, अकोला : ऍड.बाळासाहेब आंबेडकर ह्यांचे नेतृत्वाखाली हातरुण लोहारा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत वंचितच्या लिनाताई सुभाष शेगोकर 1700 मतांनी विजयी झाल्या असून मागील निवडणूक मध्ये सेनेने 98 मतांनी जिंकलेली ही जागा विक्रमी मतांनी वंचित ने खेचून आणली आहे.विशेष म्हणजे अनुसूचित जाती साठी राखीव ह्या मतदार संघात शिवसेना राष्ट्रवादी आणि प्रहार युतीने मुस्लिम समाजात विवाह केलेली बौद्ध महिला आणि काँग्रेसने देखील बौद्ध उमेदवार दिला होता.भाजपने हिंदू कार्ड म्हणून मातंग समाजाच्या उमेदवार दिला होता…एकंदरीत भाजपा विजयी व्हावी असेच सेटिंग होती..पाच पक्ष विरुद्ध वंचित अशी लढत होती.काल झालेल्या मतदान मध्ये 9500 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.यामध्ये वंचित बहुजन आघाडीच्या सौ.लीला शेगोकार यांना 4301 मते मिळाली असून या विजय झाले आहेत.तर सेनेच्या अश्विनी गवई हिला 2660 मते मिळाली असून भाजपच्या राधिका पाटेकर हिला 2091 तर काँग्रेसच्या रसिका इंगळे हिला 362 आणि अपक्ष उमेदवाराला 39 मते मिळाली असून यात काँग्रेसचा पराभव झाला असून काँग्रेसचे डिपॉझिट जप्त झाल आहे.तर वंचितला पराभूत करण्यासाठी सेना, भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि प्रहार ह्या पाच पक्षांनी छुपी युती करून सेनेला नाही जमले तर भाजप कडे मते वळवून वंचितच्या उमेदवार पराभूत करायचा घाट घातला होता.तर वंचितच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी प्रचार करत ही निवडणूक सूक्ष्म नियोजन आणि आक्रमक प्रचार ह्यातून पाच राजकीय पक्षांना पराभूत करण्याची किमया घडविली आहे.आता पुढील पोट निवडणूक लागणार आहे, व्याळा जिल्हा परिषद येथील सेनेच्या अपात्र होणाऱ्या आणखी एका सदस्याच्या रिक्त होणाऱ्या सदस्यांच्या एससी राखीव जागेवर पोट निवडणूक होणार आहे, आता या पोटनीवडणुकीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.