जनतेज न्युज

जिल्हा बँकांनी साखर करखान्या व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन शोधावे, शरद पवारांचा सल्ला

 प्रतिनिधी, नवी मुंबईत : राज्यातील जिल्हा बँकांची एक दिवसीय परिषद आज नवी मुंबईत पार पडली. या परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष शरद पवारांनी मार्गदर्शन करत समस्या जाणून घेतल्या. यावेळी पवारांनी साखर कारखान्यांना कर्ज पुरवठा करणाऱ्या जिल्हा बँकांसंदर्भात चिंता व्यक्त करत. साखर कारखाने आता साखरे सोबतच पर्यायी इथेनॉल आणि वीज तयार करत असून येणाऱ्या काळात साखर कारखान्यांनी साखरेवर पैसे घेण्यास बंद केले तर त्याचा परिणाम साखर कारखान्यांवर अवलंबून असणाऱ्या जिल्हा बँकांवर होण्याची शक्यता असून यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करणार असल्याची प्रतिक्रिया शरद पवार यांनी व्यक्त केलेय.