जनतेज न्युज

जिल्ह्यातील 5वी ते 8 वी चे वर्ग दिनांक 27 तारखे पासून होणार सुरू, शिक्षण विभाग निर्जंतुकीकरण करून सज्ज.

प्रतिनिधी , मागील दहा महिन्यांपासून बंद असलेल्या पाचवी ते आठवीच्या शाळा 27 जानेवारीपासून सुरू होणार आहे . शिक्षण विभागाच्यावतीने ही तयारी केली जात असून पालक विद्यार्थ्यांमध्ये शाळेत जाण्या बाबत उत्सुकता दिसून येत आहे .
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होत असल्याने मुलांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात आहे . यासाठी वर्ग पाच ते नववी च्या वर्गांना अध्यापन करणारया सर्व शिक्षकाची कोरोना चाचणी घेतली गेली आहे . सोबतच शाळा निर्जंतुकीकरण , स्वच्छता , विद्यार्थ्यांना मास्क , सॅनिटायझर , या बाबीवर भर देण्यात आला आहे . विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने गुरुजींना या बाबी उपलब्ध ठेवण्यासाठी आता शाळा पातळीवर लगबग सुरू झाल्याचे आहे दिसत आहे.
यापूर्वी कोरोनाची भीती वाटत होती, त्यामुळे मला मुलांना शाळेत पाठवायला योग्य वाटत नव्हते पण आता कोरोना या आजारावर व्ह्याक्सीन उपलब्ध झाल्यामुळे मुलांना शाळेत पाठवा ना काही भीती वाटत नाही.

 अर्चना लुटे,पालक.

 सांडू  घोडतुरे ,पालक.

विनायक मोकासरे, पालक.

दिनांक 27 तारखेला शासनाने 5 ते 8 पर्यंतचे वर्ग पूर्ववत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे त्या अनुषंगाने शाळेतील प्रत्येक वर्ग सॅनिटायझर करून स्वच्छ केला आहे पालकांनी कसलीही भीती न बाळगता आपल्या पालकांना नियमित शाळेत पाठवावे.

बी.एम. बडगे , मुख्यध्यपक. जि. परिषद हायस्कूल धावडा.

स्वच्छता कर्मचारी महिला जिल्हा परिषद हायस्कूल .

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू होत असल्याने मुलांच्या आरोग्याची पूर्ण काळजी घेतली जात असली तरी किती पालक 27 तारखेपासून आपल्या पाल्यांना शाळेत पाठवतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.