प्रथिनिधी, सोलापूर : सोलापूरकरांना कुठलीही सुविधा महापालिका पुरवत नसल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे.टॅक्स भरू नका म्हणत शिवसेनेने व्यापाऱ्यांना फॉर्म वाटले आहेत.महापालिकेने वाढवलेल्या टॅक्स ला शिवसेनेने कडाडून विरोध केलाय.वाढीव टॅक्स का द्यावा.आम्ही अतिरिक्त बांधकाम केले नाही.त्यामुळे हा वाढीव टॅक्स बेकायदा असल्याचं फॉर्म मध्ये नमूद करण्यात आले आहे.कर संकलन अधिकाऱ्यांना व्यापाऱ्यांकडून भरून घेतलेले फॉर्म देण्यात येणार आहेत.
शंभर टक्के उजनी धरण भरलेले असताना शहरवासीयांना नऊ दिवस आड पाणी मिळत आहे.व्यापारी पेठेत एकही सार्वजनिक मुतारी नाही.रस्ते खोदलेले आहेत.खोदलेल्या रस्त्यामध्ये खड्ड्यांमध्ये नागरिकांचे हकनाक बळी गेले आहेत.यामुळे शिवसेना आक्रमक झाली असून टिळक चौक व्यापारी पेठेमध्ये शिवसेनेने फॉर्म पत्रक वाटून टॅक्स भरू नका असं आवाहन केले आहे.
