जनतेज न्युज

ठाणेकर घेतायत बोटिंगची मजा… तब्बल दहा महिन्यांनी मासुंदा तलाव मध्ये बोटिंग सुरु..

प्रतिनिधी , मुंबई : कोरोनाकाळात गेले आठ ते दहा महिने संपूर्ण देश घरात बंद होता व बाहेरील विरंगुळ्या पासून वंचित होता. या दहा महिन्यात अनेक सण उत्सव आले आणि गेले पण नागरिकांना त्याचा नेहमीप्रमाणे आनंद घेता आला नाही. परंतु आता कोरोना संक्रमण कमी होत असून वॅक्सीन देखील येऊ घातलेली असल्याने सर्वत्र उत्साहाचे वातावरण पहायला मिळत आहे. त्यातच आता ठाणेकर नागरिकांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. गेली अनेक दशके ठाणेकरांचे आवडते विरंगुळ्याचे ठिकाण म्हणजे मासुंदा तलाव आणि त्यातील बोटिंग. लॉकडाऊनमध्ये बंद असलेली हि बोटिंग पुन्हा एकदा सुरु झाली असून त्याचा आनंद घेण्यासाठी ठाणेकर बाहेर पडू लागले आहेत. आज शनिवार असल्याने अनेक ठाणेकरांनी आपल्या लहानग्यांना घेऊन बोटिंगचा आनंद लुटला. आलेल्या सर्वांचे टेम्परेचर चेक करून त्यांना सॅनिटाइजर वापरणे अनिवार्य आल्याचे येथील संचालकांनी सांगितले. बोटिंग च्या दरात वाढ न करताच, बोटिंग करताना घेतल्या गेलेल्या खबरदारीची देखील त्यांनी माहिती दिली. तर दुसरीकडे पालक देखील आपल्या मुलांसोबत बाहेर पडून आनंद घ्यायला मिळाल्यामुळे अतिशय प्रसन्न दिसत होते.