प्रतिनिधी , ठाणे : ठाणे पोलीस आयुक्तालयातील डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी गावातील केदारेश्वर मंदिरात चोरी करणाऱया दोन चोरट्यांसह रिक्षातील प्रवाश्याना लुटणाऱ्या दोघांना अश्या एकूण पाच जणांना ठाण्यातील डायघर पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून मुद्देमाल हस्तगत केला आहे या चारही आरोपीना ८ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे
शिळफाटा परिसरातील पिंपरी गाव येथील केदारेश्वर मंदिरातील मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून दानपेटी चोरणाऱ्या शरीफ शेख आणि मोहंमद मुल्ला या दोघांना अटक केली आहे .. तर कल्याण फाटा येथून कळंबोली येथे जात असतानाच दहिसर मोरी येथे रिक्षेने प्रवास करणाऱ्या प्रवाश्याला लुटणाऱ्या मोहंमद इब्राहिम आणि मुस्तफा पावसकर या दोघांना अटक केली आहे .. त्याच्याकडून लॅपटॉप, पावर बँक आणि आधारकार्ड ,रिक्षा असा एकूण ६५ हजाराचा मुद्देमाल हस्तगत केला आहे
