प्रतिनिधी, ठाणे : जेरी डेव्हिड यांच्या धमक्या मनमानी कारभार व पक्षविरोधी वागणुकिला कंटाळून मि मनोज नारकर माझा जिवन प्रवास संपवत आहे .
जेरी डेव्हिड यांचा धमक्या हुकूमशाही व पक्षविरोधी कामाचा माननीय पालकमंत्री सोहब व माननीय ठाणे जिल्हाप्रमुख साहेब यांच्या कडे गेली चार साडेचार वर्ष जे सत्य आहे ते लेखी स्वरूपात पत्रव्यवहार करत आहे याची माहिती शाखेतील पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांना माहिती दिलेली आहे त्या साठी मला व माझ्या सोबत असणाऱ्या मित्र परिवाराला जीवे मारण्याची भाषा समाजात पसरवत आहे पुढील निवडणुकी मध्ये ह्या पत्राचा फटका मोठा बसू शकतो म्हणून ह्याच्या आधी विभागातील नागरिकांना काम व एकही रुपया न देणारा माणूस आज विभागातील पदाधिकारी युवकांना व रहीवासी यांना पैसा व दारू चे अमिश दाखवून आपल्या गुंड प्रवृत्तीत ओढत आहे व त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून माझ्याबद्दल भडकून माझ्यावर व मित्रांवर मारहाण किंवा खुनाचा प्रकार होणे आहे म्हणून असा प्रकार घडू नये विभागातील माझ्या मित्रांवर गुन्हे दाखल होऊ नये म्हणून मी माझा जीवन प्रवास इथेच थांबत आहे
कारण पैसा सत्ता व पोलीस प्रशासन जेरी डेव्हिड यांचा खिशात असल्यामुळे मला न्याय मिळणार आहे की नाही हे मला माहीत नाही
आपला मित्र
मनोज ह नारकर
(शाखाप्रमुख)
माझ्या अंत्ययात्रेत येणाऱ्या सर्व मित्रांना विनंती आहे की विभागातील गुंड प्रवृत्ती पळवून लावण्यासाठी शाखेतील नगरसेविकेचे कार्यालय व जिम चे सामान बाहेर काढून त्याचा टॅक्स शिवसेना पक्षाच्या नावे लावण्यात आल्यावरच माझा प्रेताचे अंत्यदर्शन व अंत्ययात्रा काढण्यात यावी ही विनंती
