प्रतिनिधी , नांदेड : केंद्र सरकारने नवीन कृषी विधेयक घाईघाईने कोणाशीही चर्चा न करता बहुमताच्या जोरावर आणले तसेच हा कृषी कायदा शेतकरी हिताचे नाहीत. या कायद्यांविरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. हे कायदे रद्द करावेत यासाठी दिल्लीच्या सीमेवर लाखोंच्या संख्येने शेतकरी आपला हक्क मागण्यासाठी जमलेत. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज रात्री स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आत्मक्लेश व रात्रभर जागर आंदोलन करण्यात आले.
यावेळी केंद्र सरकारने लागु केलेला नवीन कृषी कायदा तत्काल मागे घेऊन शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करण्यात आली.
