जनतेज न्युज

दिव्यांगाचा निधी वाटप न केल्याप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल – राज माहुरकर

प्रतिनिधी , नांदेड : दिव्यांगाचा निधी वाटप न केल्याप्रकरणी माहिती अधिकारातून धक्कादायक माहिती समोर आली आहे. बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांकडे अनेक वेळा तक्रारी करूनही कुठलीच कारवाई होत नसल्याने अखेर अखिल भारतीय अंपग कामगार संघटनेच्या वतीने दिव्यांग निधी अपहार प्रकरणी औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल करण्यात आले असल्याची प्रतिक्रिया अखिल भारतीय अंपग कामगार संघटनेचे तालुका सचिव राज माहुरकर यांनी दिली आहे.