प्रतिनिधी , मुंबई : यवतमाळ : मुंबई येथील लोकल रेल्वे प्रवासाला सुरुवात करण्यात यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्यानुसार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी15 ऑगस्ट पासून रेल्वे प्रवास सुरू करण्यास सहमती दर्शविली. कोरोनाची दुसरी लस घेतलेल्या नागरिकांना रेल्वे प्रवास करता येणार आहे. मात्र, पहिला डोस घेतलेल्या अनेकांना दुसरा डोस मिळाला नाही. त्यांच्या संदर्भात प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत लवकरच नवीन निकष ठरविण्यात येणार असल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले. यवतमाळ जिल्हा दौऱ्यावर आले असता त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
