भाजपा युवा मोर्चाच्या वतीने नोटीसीची होळी… आंदोलन…
प्रतिनिधी, जळगाव : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना पोलिसांनी बजावलेल्या नोटीसीच्या विरोधात येवल्यातील भाजपा युवा मोर्चा आक्रमक झाले असून शहरातील सहस्रार्जुन चौकात एकत्र जमून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाउपाध्यक्ष मयूर मेघराज यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या पदाधिकरी व कार्यकर्त्यांनी या नोटीसीची होळी करत आंदोलन केले. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे.
