प्रतिनिधी : शिदखेडा तालुका व दोडाईचा शहर व परिसरात जिल्हाप्रशासनातर्फे दिलेल्या आदेशानुसार आज सकाळ पासून जनता कर्फ्यू लागू करण्यात आला. २७ मार्चच्या सकाळी सहा पर्यंत दोंडाईचा शहर परिसर ग्रामीण भागात जनता कर्फ्युची घोषणा करण्यात आली आहे. यामुळे आज शिदखेडा तालुका व दोंडाईचा शहर व परिसरात जनता कर्फ्युला जनते कडून तसेच व्यपारी वर्गाकडून चांगला प्रतिसाद मिळाला आहे.
अश्याच प्रकारे पुढील २ दिवस सहकार्य मिळावे, व विनाकारण रस्त्यावर फिरू नये असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
लग्न कार्य ५० व्यक्तीचा मर्यादेत परवानगी घेवून करता येईल ,
मंगल कार्यालयात नियमांचे पालन करावे प्रशासनाला कठोर कार्यवाही करण्यास भाग पाडू नये अशी विनंती करण्यात येत आहे. शहरात आज सकाळपासूनच सर्व लहान-मोठे व्यवसायिकांनी आपापले व्यवसाय बंद ठेवून जनता कर्फ्युला शंभर टक्के प्रतिसाद दिला आहे.
