जनतेज न्युज

दोन माजी सैनिकांच्या घरावर अज्ञात आरोपिकडून दरोडा.

रोख आणि सैनिकाची परवाना धारक पिस्टल घेऊन पसार ; आरोपितांचा शोध सुरू
प्रतिनिधी , कामठी : नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीअंतर्गत रणाळा पुरुषोत्तम ले आउट येथे राहणाऱ्या माजी सैनिकांच्या घरी ता. १६ चे पहाटे अज्ञात पाच आरोपीनी दरोडा घातला आहे.आरोपीनी फिर्यादी सुनील डेविड माजी सैनिक यांच्या घराचे रात्री २:३० चे सुमारास दाराचे कुलूप तोडून समोर झोपून असलेल्या मुलाला बंधक बनवून
आरडा ओरड केल्यास जीवे मारण्याची धमकी देत घरातील रोख रक्कम आणि त्यांच्या कडली परवाना धारक पिस्टल घेऊन पसार झाले आरोपी येवढ्यावरच थांबली नसून त्याचा वसाहतीतील
माजी सैनिक शरद सहारे हे कामानिमित्त घराला कुलूप लावून कुटूंबासह बाहेर गेलेले होते.त्यांच्याही घरी आरोपींनि संपूर्ण घराची उचल ठेव केली मात्र हाती काहीच लागलं नसल्याने आरोपींनी पळ काढला यातील कुठला घटना पाहिले हे सध्या तरी सांगता येत नसून सकाळी नवीन कामठी पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली यावर सिपी अमितेशकुमार डीसीपी निलोत्पल एसीपी कार्यकर्ते यांनी घटना स्थळी दाखल होऊन तपासाला सुरवात केली.