जनतेज न्युज

धुळे जिल्ह्यातील वाकी येथे आज दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास घरात गॅस गळतीमुळे आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक

प्रतिनिधी , धुळे : धुळे जिल्ह्यातील वाकी येथे आज दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास घरात गॅस गळतीमुळे आग लागल्याने घरातील संपूर्ण साहित्य जळून खाक झाले आहे चार कुटुंब घरात एकत्र राहत असल्याने 17 सदस्य या घरात राहत होते घरातील सर्व महिला पुरुष लहान मुले ही शेतात कामासाठी गेले असता दुपारी एक वाजेच्या सुमारास बंद घराला अचानक आग लागल्याने घरातील सर्व साहित्य कपडे गहू बाजरी सोयाबीन भात नागली शेंगा यासह कपाटातील दोन ते अडीच लाख रुपये जळून खाक झाले आहेत तसेच आग मोठ्या प्रमाणात असल्याने संपूर्ण छत कोसळून घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे, सदर आग ही गॅस गळती मुळे लागल्यास चे घरातील कर्ता पुरुष साहीसिंग मांग्या भारुडे, भुऱ्या रायसिंग भारुडे, दानील रेश्मा भारुडे यांनी यावेळी सांगितले, स्थानिक ग्रामस्थांनी घरातील सदस्यांना शेतात जाऊन घर मालकाला कळविले की घराला आग लागली आहे घरातील सर्व सदस्य घराजवळ आले असता स्थानिक गावातील सर्व महिला पुरुष नागरिक हे घराचे आग इतर घरांना लागेल या हेतूने घराच्या बाहेर पडून होते होते कारण असे की घरात तीन सिलेंडर असल्याने स्पोर्ट होऊ शकतो या भीतीने आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिक पुढे सरसावले , तसेच काही नागरिकांनी शेजारुन तसेच विविध ठिकाणाहून गुंडांनी पाणी आणून घराची आग विझविण्याचा प्रयत्न केला तसेच अग्निशामक बंबला कळविण्याचे सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौरे यांनी सांगितले पण अग्निशामक बंब या ठिकाणी आला नाही अशी देखील खंत त्यांनी केली सरपंच जालमसिंग देसाई व सामाजिक कार्यकर्ते प्रवीण चौरे यांनी या कुटुंबांना त्वरित नुकसान भरपाई मिळावी यासाठी शासनाकडे मागणी केली आहे सदर कुटुंब हे रस्त्यावर आले असून त्यांच्याकडे फक्त अंगावरचे कपडे आहेत तरी महसूल विभागाने तत्काळ लक्ष देऊन त्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी केली आहे. तर अनिल रेश्मा भारुडे याला नवे ट्रॅक्टर घ्यायचा असून घरात दोन लाख रुपये शिल्लक ठेवले होते पण या आगीमध्ये संपूर्ण पैसे जळून खाक झाल्याचे दांनील भारुडे यांनी सांगितले, तसेच इतर भावांची देखील शिल्लक असल्याने ती या आगीमध्ये जळून खाक झाली आहे,.