जनतेज न्युज

धुळे नंदुरबार विधानपरिषद निवडणूक येत्या १ डिसेंबर रोजी जाहीर.

प्रतिनिधी , धुळे : कोरोनामुळे स्थगित झालेल्या धुळे-नंदुरबार स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील विधान परिषद निवडणुकीची स्थगिती झाल्या नंतर पुन्हा घोषणा करण्यात आली आहे. गेल्या १ एप्रिलला ही निवडणूक स्थगित करण्यात आली होती. आता येत्या १ डिसेंबर रोजी या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, तर ३डिसेंबर रोजी मतमोजणी धुळ्यात च पार पडणार आहे.
धुळे नंदुरबार ची विधानपरिषद निवडणूक एप्रिल महिन्यात होणार मोती मात्र, कोरोना मुळे तिला स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता ही निवडणूक आता १ डिसेंबर रोजी पार पडत आहे या निवडणुकीची मतमोजणी ३ डिसेंबरला होणार आहे. निवडणूक स्थगित झाली तेव्हा भाजपतर्फे अमरीश पटेल यांनी, तर काँग्रेसकडून अभिजीत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरले होते. याच दोघा उमेदवारांमध्ये आता निवडणूक होणार आहे.
अमरीश पटेल यांनी गेल्या विधानसभा निवडणुकीआधी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांनी राजीनामा दिल्याने ही निवडणूक होत आहे. ही निवडणूक भाजपसाठी महत्वाची आहे. तर काँग्रेससाठीही महत्वाची आहे. कारण सध्या काँग्रेस सत्तेत आहे. तर भाजप विरोधी पक्षाची भूमिका बजावत आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार याचीच चर्चा आहे.