प्रथिनिधी, धुळे :
धुळे शहरातील एलआयसी किंग असलेल्या राजेंद्र बंब याच्यासह त्याच्या भावाच्या घरावर धुळे आर्थिक गुन्हे शाखेसह पाच पथकांनी एकाचवेळी छापा टाकला. काल रात्री उशिरापर्यंत चाललेल्या चौकशीत पोलिसांना कोटी रुपयांचे घबाड हाती लागले आहे आणि महत्त्वाचे दस्तावेज देखील हाती लागले आहेत.
राजेंद्र जीवनलाल बंब याच्याविरोधात काल आझादनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पोलीस अधीक्षक प्रविणकुमार पाटील, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बच्छाव पोलीस उपअधीक्षक ईश्वर कातकाडे यांच्या मार्गदर्शनात अतिशय गुप्तता बाळगत आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस उपनिरीक्षक हर्षवर्धन बहिर, पोलीस अंमलदारांचे तसेच सावकारांचे सहायक निबंधक तथा उप-निबंधक, सहकारी संस्था यांच्या कार्यालयातील कर्मचार्यांचे स्वतंत्र 5 छापा पथके तयार करण्यात आली. आणि राजेंद्र बंब यांच्या राहत्या घरी काल दुपारी धाड टाकण्यात आली.
यावेळी त्यांच्या घरातून तब्बल सव्वा कोटींची रोकड, 46 लाखांचे 998 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, अनेक आक्षेपार्ह दस्ताऐजव जप्त करण्यात आली आहे. जवळपास पाच पथकाने टाकलेली ही धाड सुमारे 9 ते 10 तास संपूर्ण चौकशीला लागला. अशी माहिती पोलिस अधिक्षक प्रविणकुमार पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अंतिम पंचनामा कारवाईकरुन मुख्य आरोपी राजेंद्र बंब याच्या घरातून 1 कोटी 30 लाख 1 हजार 150 रुपये रोख व 46 लाख 22 हजार 378 रुपयांचे 998.470 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागीने तसेच आरोपीचा भाऊ संजय बंब याच्या घरातून गुन्हयाशी संबंधीत कागदपत्रे आणि 12 लाख 9 हजार 400 रुपये रोख असा मुद्येमाल पोलिसांनी जप्त केला आहे. अधिक तपास पोलिस करीत असल्याची माहिती पोलिस अधीक्षक प्रवीण कुमार पाटील यांनी दिली.
