जनतेज न्युज

नंदुरबार शहरातील मंगल बाजार येथे आज एका घरात सिलेंडर चा भडका होऊन लागली आग

प्रतिनिधी , नंदुरबार : नंदुरबार शहरातील मंगल बाजार येथील सिद्धिविनायक चौकात आज दुपारच्या सुमारास सिलेंडरचा भडका उडाल्याने आग लागली. या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे .सुदेवाने यावेळी घरात कोणी नसल्याने जिवीत हानी झाली नाही परंतु मोठ्या प्रमाणात वित्त हानी झाली आहे. परिसरातील नागरिकांना याबाबत कळल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेवून तात्काळ मदत कार्य सुरू केले. यावेळी जीतू राजपूत, संजय भदाने, आशिष कापणे, परिमल कासार,भटू राजपूत तसेच परिसरातील नागरिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले. तसेच यावेळी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबला बोलावण्यात आले. अग्निशमन बंबच्या मदतीने आग आटोक्यात आणली गेली. दरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.