प्रतिनिधी , उस्मानाबाद : उस्मानाबाद नगर I जिल्ह्याच्या बॉड्रीवर असलेल्या किल्ले शिवपठ्ठण खर्डा ता जामखेड येथे उत्खनन सुरू असुन येथे तब्बल ३०० शिवकालीन तोफगोळे आढळूण आले आहेत .
मराठ्यांची निजामाशी झालेल्या शेवटच्या लढाईचे प्रतीक असलेला भुईकोट किल्ले शिवपठ्ठण खर्डा चे उत्खनन सुरू असुन किल्ल्यातील वाड्यांचा पाया आढळत आहे . यात जवळपास ३०० शिवकालीन तोफगोळे आढळले असुन हा शिवकालीन ठेवा जपण्याची मागणी होत आहे .
