प्रतिनिधी , नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी येथील स्थानिक प्रकल्पग्रस्त आगरी – कोळी समाजाची सुरवाती पासूनची मागणी असताना नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी या विमानतळाला बाळासाहेब ठाकरे याचे नाव द्यावे असे पत्र मुख्यमंत्र्यांना दिल्याने वाद निर्माण झालाय. यामुळे नवी मुंबई आणि रायगड मधील स्थानिक प्रकल्पग्रस्तांनमद्ये नाराजी निर्माण झाली असून त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाला तीव्र विरोध केलाय. आगामी नवी मुंबई महापालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकी डोळ्या समोर ठेऊन एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा वापर करण्यास सुरुवात केली असून, दि बा पाटील यांच्या व्यतिरिक्त कोणाचेही नाव विमानतळास देऊ देणार नाही अशी भूमिका मनसे ने घेतलेय.
