जनतेज न्युज

नुपूर शर्मा आणि नवीन जिंदालच्या विरोधात स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन आक्रमक

प्रतिनिधी, सोलापूर : सोलापूर शहरात स्टुडंट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडिया आक्रमक झालेली दिसून आली. या संघटनेच्या वतीने सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निदर्शने करण्यात आली. नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या विरोधात कठोर शासन व्हावे अशी मागणी या आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी केली. यूपीत सुरू असलेली बुलडोजर कारवाईचा निषेध देखील यावेळी करण्यात आली. भारतात लोकशाही असून जर कोणी गुन्ह्यात दोषी आढळला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. मात्र बुलडोजर कारवाई ही एकतर्फी असून अन्यायकारक असल्याची प्रतिक्रिया स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशन ऑफ इंडियाच्या वतीने देण्यात आली.