प्रतिनिधी, कल्याण : दुसऱ्या पक्षातील लोकावर खोट्या केसेस टाकून आपल्याकडे असलेल्या काही गोष्टी उघड करण्याची धमकी देत लुटमारी करण्याची त्यांची जुनी सवय आहे. राजकारण एका वरच्या पातळीवर झाले पाहिजे लोकाना त्रास न देता मोठा विचार करून राजकारण करावे मात्र पक्षप्रमुखच कोत्या मनाचे आहेत मग त्यांच्या पिल्लाकडून काय अपेक्षा करणार असा सवाल करत मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली नाराजी व्यक्त केली. तर आपल्याला भोंग्यावरून पोलिसांनी भाद्वी कलम १४९ अंतर्गत नोटीस धाडली होती या नोटीसीचा जबाब देण्यासाठी आमदार राजू पाटील आज डोंबिवली मानपाडा पोलीस ठाण्यात आले होते. यावेळी मनसेच्या नगरसेवका सह १० पदाधिकार्यांनी शिवसेनेत प्रवेश केला याबाबत राजू पाटील यांना विचारले असता त्यांनी दुसऱ्या पक्षातील लोकांना धमकावून त्यांना पक्ष बदलण्यास भाग पाडले जात असून आम्हाला हे अपेक्षितच असल्यामुळे अशा घटना भविष्यात घडल्या तर आश्चर्य वाटणार नाही. प्रत्येक मनसैनिक हा इथला नगरसेवक आमदार असल्यामुळे कोण पक्षातून गेल्याने आम्हाला फरक पडणार नसल्याचे ते म्हणाले. तर घाणेरडे राजकारण करून आपला पक्ष वाढविण्याची वेळ यांच्यावर यावी सारखी दुर्दैवी बाब दुसरी नसून विचाराची लढाई विचारांनी लढवली जावी मात्र दुर्दैवाने त्यांना हे सध्या समजवण्यासाठी त्यांच्याबरोबर कोणी नसल्याने त्यांची तत्वे धोरणे घेऊन चालले आहेत. असा आरोप त्यांनी केला.
