जनतेज न्युज

पत्रीपुलाच्या दुसऱ्या गर्डरचे काम 5 डिसेंबरपर्यंत होणार पूर्ण…

प्रतिनिधी , ठाणे : कल्याण डोंबिवलीकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असणाऱ्या पत्रीपूलचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असून, 76 मीटर लांबीच्या गर्डरचे मागील आठवड्यात यशस्वी लॉंचिंग करण्यात आले आहे. आज 27 ते 28 नोव्हेंबर दरम्यान रात्री दीड वाजल्यापासून तीन तासांचा मेगाब्लॉक घेत पुलाचा मोठा गर्डरचे टेकू हटवून खांबावर हा गर्डर फिक्स केला जाणार आहे तर या पुलावर काँक्रिटीकरणाची तयारी सुरू असल्याची माहिती रस्ते विकास महामंडळाचे मुख्य अभियंता शशिकांत सोनटक्के यांनी सांगितले .
दरम्यान शुक्रवार आणि शनिवार दोन दिवस पत्रिपुलाच्या उर्वरित कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात आला असून मेगाब्लॉकदरम्यान होणाऱ्या तांत्रिक कामाची तयारीही पूर्ण झाल्याची माहिती एमएसआरडीसीचे मुख्य अभियंता सोनटक्के यांनी दिली आहे. तर दुसरीकडे पुलाच्या उर्वरित 33 गर्डरचे काम पूर्ण झाले असून हा गर्डर हैदराबाद मधील ग्लोबल स्टील कंपनीतून कल्याण कडे पाठवला जाईल उद्या रात्री पर्यंत हा गर्डर कल्याणा दाखल होणार आहे .त्यानंतर त्याची व्यवस्थित जोडणी करून 5 डिसेंबरपर्यंत तो त्याच्या नियोजित जागेवर बसविण्यात येणार आहे.
एकीकडे पुलाचे काम पूर्ण करतानाच पुलाला जोडणार्‍या जोड रस्त्याची कामे देखील सुरू करण्यात आली आहेत नागरिकांना होणार या त्रासातून सुटका करण्यासाठी डिसेंबर अखेरपर्यंत पत्री पूल वाहतुकीसाठी पूर्ण करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सोनटक्के यांनी सांगितले.