प्रतिनिधी , बुलडाणा – दिवसेंदिवस जिल्ह्यात कोरोना झपाट्याने वाढत आहे. नागरिक सुद्धा पाहिजे तसे गंभीर नाहीत. 80 टक्के नागरिक विना मास्क वावरताना दिसत आहे. प्रशासन पातळीवर विविध प्रकारचे निर्बंध लावले आहेत. रात्रीची संचारबंदी, आठवडे बाजारपेठा कड़क बंद असे निर्बंध लावले असून सुद्धा कोरोना बाधितांची आकडेवारी वाढतच आहे. त्यांमुळे आता प्रशासनाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात पथनाट्याद्वारे जनजागृती करण्याचा निर्णय घेतला आहे.
आज या पथनाट्या ला जिल्ह्याधिकाऱ्यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली आहे. आज जिल्ह्याधिकारी रामामूर्ती यांनी या पथनाट्य उपक्रमाला सुरुवात करण्याची परवानगी दिली. त्यानुसार शासनाच्या त्रिसूत्री धोरणाचा अवलंब करण्याबाबत जनजागृती करण्यात येणार असल्याची माहिती पथनाट्य कलाकारांनी दिली. यात विनामास्क फिरू नका. सुरक्षित अंतर ठेवा व सातत्याने हात धुवून स्वच्छ करा. या त्रिसूत्री धोरणांविषयी जनजागृती करण्यात येणार असल्याचे सांगितले.
