जनतेज न्युज

परमबीर सिंह यांची चौकशी करा; यवतमाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे निषेध आंदोलन

प्रतिनिधी , यवतमाळ : पोलिस अधिकारी परमबीर सिंह यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेले आरोप बिनबुडाचे आहेत. त्यांच्यावर आरोप करण्यात आले. त्यावेळी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर आरोप करून महाविकास आघाडीला बदनाम करण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. तसेच भाजप नेत्यांचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते.