जनतेज न्युज

पुण्यातील स्टार्टअप कंपनीकडून फेसबुकवर अँप चोरीचा दावा

प्रतिनिधी , पुणे : सोशल मीडियावर सर्वाधिक लोकप्रिय असलेलं ॲप म्हणजे फेसबुक. आणि याच फेसबुक वर पुण्यातील एका कंपनीने अँप चोरीचा दावा केलाय. मोर दॅन जस्ट फ्रेण्ड्स या पुण्यातील स्टार्टअप कंपनीने त्यांच्या अँपविषयाची कल्पना कॉपी केल्याने त्यांनी फेसबुकवर कोर्टात दावा दाखल केला. 2018 ला हे ऍप सुरू करण्याआधी त्यांनी फेसबुक सोबत बोलणी केली होती. परंतु काही उत्तर न देता फेसबुकने त्यांच्या अँपची कॉपी करून स्वतःचे ॲप सुरू केल्याचा यामध्ये दावा करण्यात आलाय. एमपीजे हे मोबाईल डेटिंग ॲप असून या ॲपमध्ये स्वतःच्या मित्रासोबत आपली ओळख लपून बोलता येते. या ॲपद्वारे मित्र-मैत्रिणींना न घाबरता मनातल्या भावना व्यक्त करता येतात. फेसबुकने सिक्रेट क्रश नावाचे अँप सुरू केले असून यावर पुण्यातील कंपनीने आपलं पेटंट चोरल्याच म्हंटलंय. या बाबत पुणे कोर्टात चार वेळा सुनावणी देखील झालीय. फेसबुकच्या स्थापनेपासूनच फेसबुकवर अनेकदा चोरीवरून न्यायालयिन खटले चालू असल्याचे दावा दाखल केलेल्या संग्राम काकड यांनी केलाय. आणखी एक महत्वाची बाब म्हणजे फेसबुकने जी कॉन्फरन्स घेतली त्यात आमच्याच कंपनीचा उल्लेख केल्याचा पुरावा कोर्टात सादर केल्याचं काकड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलंय.