प्रतिनिधी , भंडारा : गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या वतीने कारधा ते खडकी या मार्गावर करचखेड्याजवळ नाल्यावर पूल बांधण्यात येत आहे. हा पूल तांत्रिकदृष्ट्या चुकीच्या पद्धतीने बांधण्यात येत असल्या चुका दुरुस्त करून योग्य पद्धतीने नियोजन करीत पुलाचे काम करण्या त यावे या मागणीसाठी आज गावकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन केले.
गोसेखुर्द प्रकल्पाच्या बाधित क्षेत्रात येत असलेल्या या मार्गाची उंची वाढवून त्या ठिकाणी पूल निर्माण करण्याचे काम गोसेखुर्द पुनर्वसन विभागाच्या वतीने करण्यात येत आहे. करचखेडा या गावात तयार होत असलेला हा पूल चुकीच्या पद्धतीने बांधण्यात येत असून बांधकाम करताना दोन्ही बाजूला पुलाच्या बाजू भरण्यासाठी काळया मातीचा वापर केला आहे. ही माती कोणत्याही क्षणी खचून जाण्याची शक्यता आहे. यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. सोबतच पुल संपतो त्याठिकाणी लगेच वळण दिले असल्याने तेथेही धोक्याची दाट शक्यता आहे. या दोन्ही गोष्टी पूलाच्या आणि प्रवाशांच्या दृष्टीने घातक आहेत. या दुरुस्त होणे गरजेचे आहे अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.
