प्रतिनिधी , धुळे : दोंडाईचा पेट्रोल डिझेल गॅस सिलिंडर दरवाढ करणाऱ्या केंद्र सरकारच्या विरोधात आज दोंडाईच्यात शिवसेनेच्या वतीने केंद्र सरकारचा निषेध करून आंदोलन छेडण्यात आले.
खाद्यतेल हे सत्तर रुपये प्रति किलो आहे मात्र पेट्रोल हे शंभरीकडे वाटचाल करत आहे याच्या निषेधार्थ आज दोंडाईचा शहर शिवसेनाच्या वतीने केंद्र शासनाच्या जाहीर निषेध करून बैलगाडीवर गॅस सिलेंडर ठेवत रॅली काढण्यात आली होती मोदी सरकारच्या निषेधार्थ घोषणाबाजी देत परिसर दणाणून सोडला जनतेला ठगणाऱ्या मोदी सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.. मोदी सरकारचा धिक्कार असो अशा घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला होता. याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख चेतन राजपूत, उप तालुकाप्रमुख शैलेश सोनार, कल्याण बागल, आकाश कोळी, आबा चित्ते दिपक मराठे, आकाश कोळी, विजय वाडीले, किशोर भोई, यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.
