प्रतिनिधी , पंढरपूर : प्रजासत्ताक दिनानिमित्त पंढरपूरच्या श्री.विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे. प्रत्येक सण, राष्ट्रीय सण, उत्सवाला ही सजावट करण्यात येते. प्रत्येक सजावट ही भाविकांच्या वतीने केली जाते.
आज देखील प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विठुरायाच्या मंदिराला सजावट करण्यात आली आहे. विठुरायाच्या गळ्यात तीन रंगाचे उपरणे घालण्यात आले आहे.देवाच्या गळ्यातील हे तिरंगी रंगाचे उपरणे सर्वाचे लक्ष वेधून घेणारे आहे.
आजची सजावट पुण्याचे भाविक सचिन आण्णा चव्हाण ह्यांच्या तर्फे करण्यात आली आहे. विठ्ठलाचा गाभारा, चौखांबीमध्ये ही आरास करण्यात आली आहे. आज देवाचे मंदिरं तिरंगामय झाल्याने देवाने देखील प्रजासत्ताक दिन साजरा केल्याचे दिसून येत आहे.
