प्रतिनिधी , नांदेड : प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीन नांदेड जिल्ह्यातील बिलोली पंचायत समिती सभाग्राहात ता.८ फेब्रुवारी रोजी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष नायब तहसीलदार ओमप्रकाश गौंड तर प्रमुख पाहुने म्हणून गटविकास अधिकारी प्रकाश नाईक, मुख्याधिकारी ईरलोड, नगरअध्यक्ष मारोती पटाईत, पोलीस निरिक्षक शिवाजी डोईफोडे , प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेचे जिल्हा प्रमुख विठ्ठलराव मंगनाळे,गणेश पाटील हंडे, उपसभापती शंकर यंकम , बळवंत पाटील संभाजी शेळके, संदिप कटारे संघटनेचे बिलोली तालूका अध्यक्ष हाणमंत शिताफुले यांच्यासह विविध तालूक्याचे तालूका अध्यक्ष ,पदाधिकारी दिव्यांग बांधव वयोवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते.
