प्रतिनिधी, नवी मुंबई : पेण हे गणपतीचे माहेर घर आहे. या ठिकाणाहून प्रतिवर्षी अनेक गणेश मूर्ती देशाबरोबर परदेशात मोठ्या प्रमाणात जातात. मागील कोरोना कालखंडा नंतर या वर्षी पुन्हा गणेश मूर्ती व्यवसाय उभारी घेताना दिसत आहे. मागील दोन वर्ष कोरोना मुले विमाने बंद असल्याने काहीच करता आले नाही. मात्र या वर्षी गणेशाच्या मूर्ती अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई, थायलंड आणि इतर जगभरात गणेश मूर्ती गेल्या असून अजून मागणी असल्याचे मूर्तिकार व्यवसायिक सांगत आहेत. परदेशी राहणारे आपले नागरिक या वर्षी मोठ्या प्रमाणावर गणेश मूर्तीची मागणी करत असल्याने उत्तम प्रतिसाद असल्याचे मूर्तिकार व्यवसायिक सांगत आहेत. तर पीओपीला शासनाने बंदी घातली असली तरी पीओपी मूर्तींना जास्त मागणी आहे. यात अनेक प्रकारचे गणेश मूर्ती मिळत असल्याने याची मागणी जास्त आहे. त्यामुळे या वर्षीचा गणेश उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जाणार असल्याचे दिसत आहे.
