जनतेज न्युज

बारामतीत दोन सावकारांविरोधात गुन्हा दाखल…

सावकारीच्या नायनाटासाठी बारामतीत पोलिस सरसावले.. शहरात रिक्षा फिरवत स्पिकरवरुन पोलिसानी अवैध सावकारीविरोधात नागरिकानी निर्भयपणे तक्रारी कराव्यात असे केले आवाहन..

प्रतिनिधी , बारामतीत : बारामती शहर पोलिसानी दोन सावकारांविरोधात गुन्हा दाखल केला असून . बारामतीत सावकारीचा समूळ नायनाट करण्यासाठी पोलिस सरसावले आहेत. शहरात रिक्षा फिरवत स्पिकरवरुन पोलिसानी अवैध सावकारीविरोधात नागरिकानी निर्भयपणे तक्रारी कराव्यात असे आवाहन केले. पोलिसानी केल्याने या आवाहनाची शहरात चर्चा आहे..
बारामतीत पोलिस निरिक्षक नामदेव शिंदे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर आता पहिल्यांदा अवैध सावकारांवर लक्ष केंद्रीत केले आहे. ज्यांच्याकडे सावकारी करण्याचा परवाना नाही, अशांनी अवैध रितीने पैसे दिले तर त्यांची वसूली होऊ शकणार नाही, असा थेट इशाराच नामदेव शिंदे यांनी दिला आहे.
बारामतीतील एका प्रथितयश व्यापा-याने काही दिवसांपूर्वी आत्महत्येचा प्रयत्न केला होता, नंतर उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. हा प्रयत्न सावकारांच्या जाचाला कंटाळूनच झाला असल्याचा त्यांच्या कुटुंबियांचा संशय असून, या प्रकरणी बारामतीतील काही दिग्गजांकडे पोलिसांच्या तपासाची सुई फिरत आहे. पोलिसांनी कुटुंबियांशी चर्चा करुन या प्रकरणी वरिष्ठ स्तरावरुन चौकशीची सूत्रे फिरु लागली आहे.
शहर पोलिसानी गुरुवारी शहरातील सर्व नागरिकांना जाहिर आवाहन करत अवैध सावकारांचा त्रास होत असेल तर थेट पोलिसांना माहिती द्यावी, मानसिक किंवा शारिरीक छळाच्या घटना घडल्यास सावकारांविरुध्द कडक कारवाईचा इशारा शिंदे यांनी दिला आहे. स्वताः पोलिस अधीक्षकांनीही याची नोंद घेतली असून या पुढील काळात अवैध सावकारांविरुध्दच्या मोहिमेला गती मिळणार आहे..
व्यापार्याची आत्महत्या सावकारीतूनच
शहरातील एका व्यापार्याने केलेला आत्महत्येचा प्रयत्न, त्याच्यावर उपचार सुरु असताना झालेला मृत्यू याची सध्या बारामतीत चर्चा आहे. या व्यापार्याच्या डायरीत शहरातील अनेक दिग्गजांची नावे आहेत. त्यात राजकारण्यांसह अनेकांचा समावेश आहे. हे प्रकरण पोलिसानी हाती घेतले तर अनेकांची पळता भुई थोडी होणार आहे. अद्याप या प्रकरणी तक्रार आलेली नसली तरी पोलिसानी मात्र चोहोबाजूने चौकशीला सुरुवात करत माहिती संकलन सुरु केले आहे . त्यामुळे या डायरीत नावे; असणारांचे धाबे दणाणले आहेत…
पोलिसांनी अवैद्य सावकारी मोडीत काढण्यासाठी कंबर कसलीय मात्र किती लोक तक्रार देणार आणि येत्या दिवसात बारामती अवैद्य सावकारी मुक्त होणार का कडे सर्व नागरिकांचे लक्ष लागले आहे