जनतेज न्युज

बारामतीत मातंग समाजाच्या मागण्यांसाठी तरुणांनी केले नगरपरिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण

प्रतिनिधी , मातंग समाजाच्या मागण्या मान्य न केल्यास लवकरचतीव्र आंदोलन छेडणार
मागील काही वर्षपासून बारामती शहरात संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा पूर्णाकृती पुतळा बसविण्याची मागणी केली जात आहे,समाज मंदिराचा प्रश्न देखील बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित असून पालिका ह्या सगळी गोष्टीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप उपोषण कर्त्यांनी पालिकेवर केला आहे.
यासाठी वेळोवेळी आंदोलने, उपोषणे,करून लक्ष वेधण्याचा वेळोवेळी प्रयत्न केला आहे.मात्र या समाजाच्या मागणीकडे पालिकेचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप उपोषकर्त्यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर मातंग समाजातील युवकाने नगरपारिषदे समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण धरले मागण्या मान्य न केल्या जनआंदोलन छेडण्याचा इशारा उपोषणकर्त्यांच्या वतीने देण्यात आलाय..