जनतेज न्युज

बीडमध्ये रेल्वे प्रश्नांवरून खा.प्रीतम मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी…!

प्रतिनिधी , बीड : गेल्या अनेक वर्षापासून रेल्वे प्रश्न सुटत नसल्याने , रेल्वे कृती समितीने आज खासदार प्रीतम मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.रेल्वे आराखडा जनतेसमोर मांडावा.ही मागणी घेऊन पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्हाधिकाऱ्यांना रेल्वे कृती समितीने निवेदन दिले आहे.निवेदन दिल्यानंतर खासदार प्रीतम मुंडेंनी केंद्राने भरघोस निधी दिल्याचा दावा करण्यात आलाय.यावर रेल्वे कृती समिती आक्रमक पवित्रा घेतला असून खासदार प्रीतम मुंडे या निष्क्रिय आहेत.फक्त जनतेला गाजर दाखवायचं काम केलंय.असा आरोप करत प्रीतम मुंडेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केलीय.