प्रतिनिधी , बुलडाणा : आपण सोने तारण ठेवून बँकेतून कर्ज घेतले आहेत.बँकेत तारण ठेवलेले तुमचे सोने सुरक्षित आहेत काय? तर सावधान… कारण ज्या मूळ ग्राहकाने बँकेत कर्जासाठी आपले लाखो रुपयांचे सोने बँकेत तारण ठेवले होते.त्या मूळ ग्राहकाने ते सोने न सोडविताच ते दुसऱ्यानेच सोडविल्याचा धक्कादायक प्रकारच बुलडाण्याच्या आयसीआयसीआय बँकेतून समोर आला आहे…
बुलडाण्यातील अमोल राठोड यांनी आपल्या व आपल्या पत्नी प्रीती राठोड यांच्या नावावर सन 2018 मध्ये बुलडाण्यातील आयसीआयसीआय बँकेतून जवळपास 8 लाख रुपयांचे सोने तारण कर्ज घेतले होते.यावेळी आपल्या जवळील 44 तोळे सोने त्यांनी आयसीआयसीआय बँकेत तारण ठेवले होते.त्यांच्याकडे आयसीआयसीआय बँकेत सोने तारण ठेवल्याचे कर्ज मंजुरीची सत्यप्रत उपलब्ध आहे.सोने तारण कर्जाची एका वर्षाची मुदत संपल्यावर राठोड दाम्पत्यांनी सन 2019 मध्ये या कर्जाच्या व्याजाची रक्कम भरून कर्ज भरण्याची मुदत आणखी 1 वाढविली .आणि यावर्षी जेव्हा तारणमध्ये ठेवण्यात आलेल्या सोन्याला सोडविण्यासाठी आयसीआयसीआय बँकेत गेले तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यांचे तारण ठेवलेले 44 तोळे सोने 14 ऑगस्ट 2020 रोजीच कोणी दुसऱ्यानेच सोडविल्याचे सांगण्यात आले.मात्र हे सोने कोणी सोडविले हे बँकेकडून सांगण्यात आले नाही. यावरून अमोल राठोड आणि प्रीती राठोड या दाम्पत्यांनी बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात आयसीआयसीआय बँकेकडून त्यांच्या 22 लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे 44 तोळे सोन्याची हेराफेरी केल्याप्रकरणी आयसीआयसीआय बँकेकडून फसवणूक झाल्याची तक्रार 8 फेब्रुवारी रोजी दिली आहे.व दोषींवर गुन्हे दाखल करून तारण ठेवलेले आमचे 48 तोळे सोने परत देण्याची मागणी केली आहे..
अमोल राठोड,तक्रारकर्ता
तर सोने हेराफेरी प्रकरणात बुलडाणा शहर ठाण्याचे ठाणेदार प्रदीप साळुंखे हे चौकशी करीत असून त्यांनी आयसीआयसीआय बँकेंला राठोड दाम्पत्यांनी कर्जासाठी तारण ठेवलेले सोन्याची व 14 ऑगस्ट 2020 रोजी सोडविण्यात आलेल्या बँकेतील सर्व कागदपत्रांची तसेच सोने तारण ठेवण्यात आलेले व सोडविण्यात आलेल्या दिवशीची बँकेतील संपूर्ण सीसीटीव्ही व्हिडीओ मागितले आहे.
प्रदीप साळुंखे,ठाणेदार पोलीस स्टे,बुलडाणा शहर
फायनल व्हिओ – तर राठोड दाम्पत्यांच्या 44 तोळे सोने हेराफेरी बाबत आयसीआयसीआय बँक मॅनेजर अमित ठाकरे यांच्याही संपर्क केला असता ते बोलण्यास तयार नाही.शिवाय राठोड दाम्पत्यांकडून बँकेत गहाण ठेवण्यात आलेले सोने मूळ ग्राहकाला न देता दुसऱ्या व्यक्तीला कसे सोने सोडवून दिले.असा प्रश्न उपस्थित होत आहे.सदर प्रकरणात आयसीआयसीआय बँकेत तारण ठेवलेल्या 44 तोळे सोन्याची बुलडाण्यातील काँग्रेसच्या एका मोठ्या नेत्यांनी संगतमत करून हेराफेरी केल्याचे बोलल्या जात आहे…
