जनतेज न्युज

बोगद्याजवळ वाहनचालकांना लुटणारी टोळी जेरबंद

प्रतिनिधी , पुणे : कात्रज जुन्या बोगद्याजवळ वाहनचालकांना लुटणार्‍या टोळीच्या भारती विद्यापीठ पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. यावेळी त्यांच्याकडून कोयता, चॉपर अशा घातक हत्यारासह 66 हजाराचा मुद्देमाल पोलिासांनी जप्त केला आहे. सुरेश बळीराम दयाळु (वय.29), चाँद फकरुद्दीन याकुब शेख (वय.22), कृष्णा विक्रम ढावरे (वय.22,रा. बिबवेवाडी) असीफ अल्लाबक्ष शेख (वय.21,रा. इंदिरानगर),आशिष नवानाथ डाकले (वय.25,रा.कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. आरोपी हे रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर जबरी चोरी, दरोड्याचा प्रयत्न असे विविध प्रकारचे गुन्हे दाखल आहे.
पोलिस उपनिरीक्षक महेंद्र पाटील हे हद्दीत गस्तीवर असताना, कर्मचारी शंकर कुंभार व जगदीश खेडकर यांना बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती की, कात्रज बोगद्याच्या अलीकडे काही लोकं अंधारात थांबली असून, धारधार हत्याराच्या धाकाने वाहनचालकांना लुटण्याच्या तयारीत आहेत. त्यानुसार उपनिरीक्षक पाटील, कर्मचारी पाटील, सुतार,वेगरे, खोेमने, संकपाळ यांच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या प्राथमिक चौकशीत त्यांनी सोमवारी सायंकाळी सहाच्या सुमारास कात्रज कोंढवा रोड कान्हा हॉटेल चौकाजवळ दुकानदारास कोयत्याच्या धाकाने लुटल्याचे सांगितले. तसचे रात्री इतरांना लुटणार असल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.