जनतेज न्युज

भारत ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरू असलेल्या क्रिकेट मॅचवर सट्टा लावणाऱ्या चॊघांना परभणी स्थानीक गुन्हे शाखेने अटक केलीये.

प्रतिनिधी , परभणी : परभणी गंगाखेड रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाजवळ हा प्रकार सुरू होता . कारवाईत तीन लाख आठ हजारांचा मुद्देमाल ही जप्त करण्यात आलाय . तर गणेश पांचाळ, गोविंद दामोदर,सचिन बनसोडे,किशोर तोष्णीवाल या सट्टेबाजांना अटक करण्यात आलीये, आरोपी सोनी TV वर चालू असलेल्या लाईव्ह मॅच वर लोकांकडून पैसे घेत सट्टा लावत होते, दरम्यान दैठणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहे