प्रतिनिधी , जालना: दिल्ली येथील सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यातील वडीगोद्री येथे बाळगोपाळांना तसेच ग्रामस्थांना दूध वाटप करून या आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे.
दिल्लीतील शेतकरी आंदोलन हे अत्यंत शांततेने सुरू आहे. या आंदोलनास महाराष्ट्रातूनही शांततेत सहभागी होण्याचे आव्हान राजू शेट्टी यांनी केले होते. त्यामुळे या आंदोलना कुठलाही गालबोट न लावता,कुठे ही अनुचित प्रकार न करता शांततेत दिवसभर बंद पाळण्यात येणार आहे.
